तळ्यात महाकाय वृक्ष कोसळले

। तळा । वार्ताहर ।
तळा शहरातील जी.एम. वेदक कॉलेजकडे जाणार्‍या रस्त्यावर मंगळवारी वादळी वार्‍यामुळे महाकाय वृक्ष कोसळले. सुदैवाने त्याठिकाणी कोणीही ये जा करीत नसल्याने जीवितहानी झाली नाही. गेल्या तीन दिवसांपासून तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असून मुसळधार पावसासह वादळी वारा देखील सुटत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या वार्‍याचा वेग एवढा प्रचंड होता की महावितरण विभागाचे काही विद्युत खांब देखील वाकलेल्या अवस्थेत होते. सदर घटनेची माहिती मिळताच नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी झाड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करुन येण्या जाण्याचा मार्ग मोकळा केला.

Exit mobile version