शिंदे गटाची नौटंकी

जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उत

| अलिबाग | प्रतिनिधी |

सरकारच्या दबावातून शहापूर येथील शेत जमिनीची मोजणी महसूल अधिकारी व एमआयडीसीच्या अधिकऱ्यांमार्फत गुरुवारी करण्यात आली. दरम्यान, शिंदे गटाचे नेतेदेखील दिखावा करीत त्यावेळी शेतकऱ्यांच्या बाजूने आले होते. शिंदे गटाच्या नौटंकीबाबत जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चेला उत येऊ लागले आहे. हा दिखावेपणा कशाला करायचा, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एका कंपनीपर्यंत जाणारा रस्ता करण्यासाठी शहापूर येथील 23 हेक्टर जमिन मोजणीसाठी गुरुवारी एमआयडीसी व महसूल अधिकारी पोलिसांचा फौजफाटा घेऊन आले होते. शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला. मात्र पोलिसांच्या बळाचा वापर करीत शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील व शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, युवा नेते सवाई पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पोलीसांना रोखले. शेकाप व शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेसमोर प्रशासनाला अखेर नमावे लागले. त्यांनी मोजणीचे काम थांबवले. सरकारने दबाव टाकून अचानक प्रशासनाला जमिनीची मोजणी करण्यास भाग पाडले. दरम्यान, शिंदे गटाचे नेते मंडळी घटनास्थळी येऊन शेतकऱ्यांच्या बाजूने बोलू लागले.

राज्यात ज्यांचे सरकार आहे, त्या शिंदे गटाच्या सरकारकडूनच दबाव असताना अलिबागमधील शिंदे गटाच्या नेत्यांकडून नौटंकी का करावी, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version