आक्षीतील संस्कृतीची सुवर्ण कामगिरी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील कुमारी संस्कृती संदेश घरत हिने राष्ट्रीय आइस स्टॉक स्पर्धेत प्रथम येण्याचा मान मिळवला. या स्पर्धेत तीने सुवर्णपदकाची कामगिरी केली. काश्मीर राज्यात गुलमर्ग येथे 9 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हिवाळी राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये 23 राज्यातील 550 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये संस्कृती घरत सिनियर गटात वैयक्तिक टार्गेट या प्रकारात सुवर्णपदक मिळवीत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. सोबतच टीम गेम या प्रकारात एक सुवर्णपदक व टीम टार्गेट या प्रकारात एक कांस्यपदक प्राप्त केले आहे. या खेळाडूने पिल्लई कॉलेजमधून कॉम्प्युटर इंजिनिअरचे शिक्षण घेतले असून तिने राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केले आहे.

जयेश चोगले, महेश राठोड, अजय सर्वोदय यांनी तिला विशेष मार्गदर्शन केले आहे. तिला विशेष सहकार्य वैभव राणे (नागाव) यांनी केले.

Exit mobile version