तिनविरा धरणात शासकीय कर्मचाऱ्याची आत्महत्या

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागमधील तिनविरा धरणात एका व्यक्तीने आत्महत्या केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची ही घटना बुधवारी (दि. 24) सकाळी घडली. शासकीय कर्मचाऱ्याने धरणात आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय काकडे (43) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती अलिबागमधील पिंपळभाट येथील रहिवासी असून, तो कर्जतमध्ये जलसंधारण विभागात कालवा निरीक्षक या पदावर कार्यरत होता. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह धरणामध्ये आढळून आला. या घटनेची माहिती पोयनाड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. विजय काकडे यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Exit mobile version