आदिवासी कुटुंबाला एक हात मदतीचा

महाड पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम

| महाड | प्रतिनिधी |

महाड पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून महाड तालुक्यातील बिरवाडी विभागातील शिवथर घळई आदिवासीवाडी येथे गृहोपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम बुधवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिवथर घळईचे उपसरपंच किशोर भोसले, समीर पवार, शिवसेना उपतालुकाप्रमुख किशोर भोसले व सर्व आदिवासी बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत, उपाध्यक्ष महेश शिंदे, सचिव रोहित पाटील, पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य श्रीकांत सहस्त्रबुद्धे, खजिनदार मिलिंद माने, सल्लागार तुकाराम साळुंखे, किशोर किरवे, उपखजिनदार सुधीर सोनार, प्रसिद्धी प्रमुख नितेश लोखंडे, कार्याध्यक्ष निलेश लोखंडे इत्यादी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.

Exit mobile version