विद्यार्थ्यांना मदतीचा हात

| पनवेल | प्रतिनिधी |

रामदास शेवाळे यांनी शासनमान्यता प्राप्त कोर्सेस करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या माध्यमातून कळंबोली विभागातील शासन मान्यता कोर्सेस करणार्‍या विद्यार्थ्यांच्या एकूण प्रवेश शुल्कापैकी एका तृतीय फी स्वखर्चातुन देणार आहेत. याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. पनवेल तालुक्यातील शेडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शासन मान्यता कोर्सेस करीता कळंबोली विभागातील अनेक युवक-युवतींनी प्रवेश घेतला आहे. मात्र हे कोर्सेस शिकण्यासाठी अनेक गरीब विद्यार्थ्यांची इच्छा असूनही फक्त पैशाच्या अभावी त्यांना आपल्या स्वप्नांच्या मागे धावत येत नाही. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी यांनी एक हात पुढे केला आहे.

Exit mobile version