| माणगाव | वार्ताहर |
माणगाव येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणार्या विवा कॉलेजचा पुरस्कार वितरण सोहळा शिक्षकदिनी सरलादेवी मंगल कार्यालय हॉल, सिद्धीनगर माणगाव या ठिकाणी कॉलेजचे पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना कॉलेजतर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विवा कॉलेज माणगावमध्ये तज्ञ शिक्षकांकडून विविध कोर्सेस शिकविले जात असून जवळपास 350 विद्यार्थी या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसचे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास पाहणारे हे कॉलेज अल्पावधीत नावारूपाला आले आहे. राज्यभरातूनही अनेक विद्यार्थ्यांनी या कॉलजमध्ये विविध कोर्सेस शिकण्यासाठी प्रवेश घेतला आहे. या कॉलजमध्ये दरवर्षी विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक यांसारखे उपक्रम सातत्याने राबविले जातात. विध्यार्थ्यांच्या विकासाबरोबरच समाजात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणार्या महनीय व्यक्तींचा त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून या कॉलेजने या वर्षांपासून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्याचा मानस केला. यंदा विविध क्षेत्रातील 22 मान्यवर व्यक्तींचा पुरस्काराने कॉलेजतर्फे सन्मान करण्यात आला.