धक्कादायक! वडखळमध्ये हॉटेल व्यवस्थापकाची गळा चिरुन हत्या


| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह (वय 40, रा. वडखळ नाका) यांची अज्ञात इसमाने गळा चिरुन हत्या केली.

ही बाब संदीप बाळू पाटील (वय 42, सध्या रा. गंधर्व हॉटेल, वडखळ, मुळ गाव गवसे, ता. चंदगड, कोल्हापूर) यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवार दि. 6 ते 7 फेब्रुवारीच्या कालावधीत पेण तालुक्यातील वडखळ सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेद्र कुशवाह यांची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राच्या सहाय्याने त्यांचा गळा कापून हत्या केली. या हत्येची माहिती मिळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी फडतरे यांनी भेट देवून घटनेची पाहणी केली आहे. याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांढरे करीत आहेत

Exit mobile version