| गडब | वार्ताहर |
सोन्याचे मंगळसूत्र आणि चैन चोरणाऱ्या दोन चोरट्यांना वडखळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. याबाबात सविस्तर वृत्त असे की दिनांक 4 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजताचे सुमारास नागोठणे पोलीस ठाण्याचे हद्दीतील शिहू गावचे नजीक पेझारी ते नागोठणे रोडवर पायी चालत असलेल्या एका महीलेचे अंगावरील सोने धातुचे मंगळसूत्र व चैन सिल्हर रंगाच्या स्कुटीवरील दोन ईसमानी जबरीने खेचुन चोरून नेल्याची घटना घडली होती.
सदर घटनेची माहीती व जबरी चोरी करणारे स्कुटीवरील दोन इसमांचे सीसीटिव्ही फुटेज नागोठणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि संदिप पोमण यांनी वडखळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक तानाजी नारनवर यांना पाठवुन दिले. त्यावरून पोलीस निरिक्षक तानाजी नारनवर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन त्यांनी व वडखळ पोलीस ठाणेकडील अधिकारी रोहीदास भोर, शिद,प रणजीत जाधव तसेच पोलीस अंमलदार दिनेश ढेणे, अमोल म्हात्रे, देसाई, नाईक, वाहतुक पोलीस अंमलदार घर्मेंद्र वर्तक, विश्वनाथ पाटील, जनार्दन म्हात्रे, प्रविण पाटील अश्यांनी वडखळ पोलीस ठाण्याचे हद्दीत विविध ठिकाणी नाकाबंदी केली.
सदर नाकाबंदी दरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमारास शिहु गावाजवळील महीलेच्या गळयातील मंगळसूत्र चोरी करणारे दोन इसम स्कुटीवरून नागोठणे बाजुकडुन वडखळ बाजुकडे येत असताना वडखळ येथील फ्लायओव्हर ब्रिजवर वडखळ पोलीस पथकाने त्यांना थांबवुन त्यांची विचारपुस केली असता त्यांनी मितेष प्रभाकर म्हात्रे वय 21वर्षे मुळ रा. कुंदाताई नगर वडखळ, ता. पेण,सध्या रा. लालडोंगर चेंबुर मुंबई तसेच दर्शन किशोर कोठेकर वय 24 वर्षे मुळ रा. गडब ता. पेण, सध्या रा. लालडोंगर चेंबुर मुंबई अशी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.त्यांचेकडुन जबरी चोरी करण्यासाठी वापरलेल्या स्कुटी (एमएच-03-डीएल-4118) व महीलेच्या गळयातुन चोरून आणलेल्या सुमारे 1लाख 50 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व चैन हस्तगत केली आहे. पोलीसांनी वरिलप्रमाणे केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे जनतेकडुन वडखळ पोलीस स्टेशनच्या पोलीसांचे कौतुक होत आहे.