| इंदापूर | वार्ताहर |
रत्नागिरीवरून मुंबईच्या दिशेने जात असलेली (एमएच-43-बिजी-6591) ही लक्झरी बस तसेच महाडच्या दिशेने जात असालेला (एमएच-05-एएम-059)1 हा ट्रक धरणाची वाडी गावाजवळ आला असता या दोन वाहनांनी एकामेकाला जोरदार धडक दिली. या अपघातात लक्झरी बसमधील एकूण 40 प्रवाशांचे जीव वाचले असून 16 प्रवासी हे किरकोळ व काही प्रवासी गंभीर जखमी झाले. त्याना माणगांव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार चालू आहेत.
सविस्तर वृत असे की, गुरू पौर्णिमेनिमित्त नवी मुंबई येथील नागरिक दि.3 जुलै रोजी नरेंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी नाणीज रत्नागिरी येथे गेले होते. दर्शन घेवून रात्री निघाले असता सकाळी ते पोलादपुरनजीक आले असता ही लक्झरी बस पंक्पर झाली होती. तो पंक्पर काढून झाल्यानंतर या ठिकाणी लक्झरी बसचा चालक बदली झाला. पुढे ही बस माणगांव इंदापुर सोडून धरणाची वाडी गावाशेजारी आली असता समोरून येत असलेला ट्रक व बसचा जोरदार अपघात होऊन ही लक्झरी बस रस्त्यावरून खाली खड्ड्यात जाऊन पलटी झाली. यामध्ये ट्रक चालक व बस चालक हे जखमी झाले आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कोलाड ते इंदापुर पर्यंत रस्त्याच्या एक साईटचे काम चालू असून ब-याच जागी दुभाजक नसल्यामुळे अपघात होत असल्याचे दिसत आहे. या अपघातात जखमी झालेल्यांची नावे कविता करके (वय 45, नवी मुंबई), पांडूरंग पाष्टे (वय 44, मुंबई), मयंक वडकर (वय 30, नवी मुंबई), शैलेश सकपाल (वय 30, नवी मुंबई), दत्तारे शिर्के (नवी मुंबई), सुरेश वाघ (वय 50, नवी मुंबई), प्रमोद शर्मा (वय 20, मुंबई), प्रकाश (वय 66, नवी मुंबई), अनिल जाधव (वय 50, नवी मुंबई), गणपत खेनले (वय 58, कळवा), तुकाराम चव्हाण (वय 55, नेरूळ), प्रकाश (वय 68, वाशी), सोनाली शेडगे (वय 30, नवी मुंबई), संतोष साळवे (वय 34, नवी मुंबई), अशिष शेलार (नवी मुंबई), कैलास राठोड (वय 45, नवी मुंबई) अशी आहेत.