। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील झिराड येथील एका रिसॉर्टच्या दरवाजाची कडी तोडून घरफोडी करण्यात आली. लाखो रुपये किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला असून, आरोपीला अवघ्या काही तासात पोलिसांनी जेरबंद केले आहे.
झिराडमध्ये होम स्टे नावाचे रिसॉर्ट आहे. शनिवारी रात्री साडेअकरा ते रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्याने रिसॉर्टमधील मुख्य दरवाजाची कडी तोडली. आतमध्ये घुसून एक लाख 32 हजार 50 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी रविवारी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पेणमधील एकाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. गुन्हा दाखल झाल्यावर काही तासातच पोलिसांनी आरोपीला गजाआड केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुमित खोत करीत आहेत.