6 जणांचा मृत्यू, 18 जखमी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
ताडदेव परिसरातील नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला भीषण स्वरूपाची आग लागली. ही आग आज (ता.२२) सकाळी साडेसातच्या सुमारास लागली. 20 मजली इमारत असून याच्या 18 व्या मजल्यावर ही आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे सहकारी पोहचले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत, दरम्यान या दुर्घटनेत मृत्यूचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी पावणे आठच्या सुमारास आग लेव्हल 3 ची होती. या आगीत 18 जण जखमी झाले असून त्यांना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन व 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.