खालापुरात कंपनीला भीषण आग

ब्राईट ईव्हर्यरमेंट सोल्युशन कंपनीत दुर्घटना
खोपोली | वार्ताहर |
खोपोली पाली रस्त्यावरील उबंरे गावच्या हद्दीत असलेल्या ब्राईट ईव्हरमेटं सोल्युशन कपंनीलाशुक्रवारी(दि.12) रात्री 11.30 भीषण आग लागली.आगीत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले आहे.यामध्ये लाखोचे नुकसान झाले आहे. मदतकार्य वेळेवर पोहचल्यामुळे आग आटोक्यात शर्तीचे प्रयत्न झाले आणि सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
ब्राईट ईव्हरमेटं सोल्युशन कपंनीमध्ये प्लास्टीकवर प्रक्रिया उद्योग असल्याने मोठ्या प्रमाणात आग पसरली. तसेच कपंनीच्या बाजुनेच गेल इंडियाची पाईप लाईनसह उच्चदाबाची विद्युतवाहिनी गेली असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची बीती व्यक्त केली जात होती.
त्यातच कपंनीच्या आवारातच कामगार राहत असल्याने आगीचे प्रमाण पाहता लवकरात लवकर आग आटोक्यात आणणे गरजेचे होते.अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे टीम सदस्य असलेले केमिकल्स एक्सपर्ट धनजंय गीध यांच्यासह सह गुरूनाथ साठीलकर,विजय भोसले, अमित गुजरे,अंकित साखरे, शैलेश आबंवणे, यतिन दळवी व अन्य सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी खोपोली फायर ऑफिसर सुर्यवंशी आणि धनंजय गीध यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले. खोपोली फायर ब्रिगेड टीम, प्रसोल केमिकल फायर ब्रिगेड टिम, गोदरेज कपंनीची फायर फायटिगं टिम ने पाच तासाच्या अथक प्रयत्नानतंर आगीवर नियत्रंण मिळविले.
आगीचीी माहीती मिळताच खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोली, खालापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते हे गुरूनाथ साठीलकर यांच्या संपर्कात होते.पहाटेच्या दरम्यान आग विझली.पण सकाळी आग धुमसू लागली असता फायरब्रिगेडची गाडी बोलावून आग आटोक्यात आली आहे.

Exit mobile version