मिठेखार येथे घरावर कोसळली दरड; वृद्ध महिलेचा मृत्यू

| रायगड | प्रतिनिधी |

रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. मुरुड तालुक्यातील मीठेखार येथे दरड कोसळल्याची घटना सकाळी घडली आहे. या गावात असणाऱ्या एका घरावर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये त्या घरात राहणारी एक 75 वर्षांच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मुरूडचे निवासी नायब तहसीलदार संजय तवर यांनी दिली. या वृद्ध महिलेचे नाव विठा मोतीराम गायकर रा. मिठेखार मंडळ बोर्ली ता. मुरुड असे आहे. ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. मुरुड तहसीलदार त्यांच्या आपत्ती निवारण यंत्रणेसह मिठेखार गावात पोहचले आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या घरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version