‘रंग वैशाखाचे’ साहित्यिक मैफिल

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

कोमसापरिषद मुरूड-जंजिरा शाखेतर्फे मुरूड दत्तमंदिर टेकडीवर शिदोरी फुडस् या ठिकाणी शनिवारी (दि.25) ‘रंग वैशाखाचे’ ही साहित्यिक मैफिल आयोजित करण्यात आले होते. यावेळी संजय गुंजाळ, उषा खोत, अरूण बागडे, नैनिता कर्णिक, दिपाली दिवेकर, देवदत्त साने, डॉ.रविंद्र नामजोशी व अन्य मान्यवरांकडून दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. सर्वांचे सुवर्ण चंपक देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर ‘रंग वैशाखाचे’ ही साहित्यिक मैफिल सुरु झाली. यात गझलकार सिद्धेश लखमदे, लेखक व कवी देवदत्त साने, दिपाली दिवेकर, रुद्धी भगत, वासंती उमरोटकर, उषा खोत, नैनिता कर्णिक, प्राची केने, योगेश दवटे, आशिष पाटील, आशुतोष कर्णिक, शकुंतला रोटकर संजय गुंजाळ यांनी भाग घेतला होता.

Exit mobile version