| पनवेल | वार्ताहर |
चिकनचे पैसे नंतर देतो असे बोलल्याने राग आला आणि चिकन कापण्याच्या सत्तुरने उजव्या हातावर मारून जखम केल्याने आरोपी नफिस खान याच्या विरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मोहम्मद जोहेब युनिस खान हा तळोजा फेस टू येथे राहत असून त्याच्या दुकानाच्या बाजूला नफीस खानचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे त्याने नफिस खानकडून शंभर रुपयांचा कलेजा पेटा घेतला होता त्याचे पैसे देणे बाकी होते. मोहम्मद चिकन विक्रीचा दुकान बंद करून जात असताना नफिस खान याने पैशांची मागणी केली. त्याच्याकडे यावेळी नंतर पैसे देतो, असे बोलण्याचा राग आल्याने नफिस मयाने सत्तुरने हातावर जखम केली.