। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा भागात मोटार ट्रेनिंग स्कूल चालवणाऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव किरण पावशे असून, तो तळोजा भागात राहण्यास आहे. तसेच पीडित विवाहिता देखील तळोजा भागात राहण्यास आहे. आरोपी किरण पावशे याचे तळोजा भागात मोटर ट्रेनिंग स्कूल असून जुलै 2022 मध्ये पीडित विवाहिता त्याच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेली होती. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील मोटर ट्रेनिंग स्कूल चालकाविरोधात बलात्कारासह शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीचा शोध सुरू केला आहे.







