कांदिवलीत इमारतीला भीषण आग

| मुंबई | प्रतिनिधी |
कांदिवली महावीरनगर येथील वीणा संतूर इमारतीमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये एका आठ वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे. ग्लोरी (43 वर्षे), जोसू रॉबर्ट (8 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत .

तीन जण जखमी असून एकाची स्थिती गंभीर आहे. लक्ष्मी बुरा (वय 40 वर्षे), राजेश्वरी भरतारे (24 वर्षे), रंजन शाह (76 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून आगीचे कारण अद्याप समोर आले आहे.

Exit mobile version