। मुंबई । वृत्तसंस्था ।
विलेपार्ले परिसरातीन प्राईम मॉलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पण ही आग नेमकी कशामुळे लागली आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. याशिवाय 8 पाण्याचे टँकरही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहेत. लेवल 4 ची ही आग असल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट झाले आहेत.