रबर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला भीषण आग

। पुणे । प्रतिनिधी ।

पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात आज सकाळच्या दरम्यान पुन्हा एका रबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. आगीमध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.

कुदळवाडी परिसरातील आर के ट्रेडर्स मॅन्युफॅक्चरिंग आणि तिच्या शेजारी असणाऱ्या अन्य दोन कंपन्यांना भीषण आग लागली आहे. गुरुवार (दि.6) असल्याने कंपन्यामध्ये कोणतेही कर्मचारी नसल्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या 15 पेक्षा अधिक बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे आली. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, आगीमध्ये कंपन्यांचे करोडोचे नुकसान झाले आहे. या तिन्ही कंपन्यामध्ये रबरचे मटेरियल बनत असल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. सगळीकडे धुराचे लोट पसरले आहे. काही प्रमाणात परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version