निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बैठक

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल तालुका पोलिसांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तसेच सणासुदीच्या निमित्ताने पदाधिकार्‍यांची बैठक घेेवून आवश्यक त्या सुचना व मार्गदर्शन केले.

यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, गोपनीय विभागाचे अधिकारी कुवर आदींनी त्यांच्या हद्दीतील विविध पदाधिकार्‍यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तसेच सणासुदीच्या निमित्ताने पदाधिकार्‍यांची बैठक घेेवून त्यांना आवश्यक त्या सुचना व मार्गदर्शन केले. तसेच, आचारसंहितेचे पालन करून सण व उत्सव साजरे करावेत, अशा सुचना सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version