कारगावातील अल्पवयीन मुलीचा अतिप्रसंगानंतर खूनच

आरोपी अटकेत, पोलिसांचे मोठे यश

| खोपोली | वार्ताहर |

कारगाव, ता.खालापूर सहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करुन तिचा खून करणार्‍या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यासाठी 20 अधिकारी आणि 200 पोलीस पथक शोध घेत होते. आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घर्गे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. अजय विजय चव्हाण, रा. कारगाव, ता.खालापूर असे आरोपीचे नाव आहे.

कारगावच्या जंगल परिसरात एका आठ वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासात वन्य पशुने हल्ला करुन तिला ठार मारण्याची शक्यता वर्तविली जात होती. कारगांव गावाच्या मागील मैदानावर कोयना पुनर्वसन क्रिकेट सामने शुक्रवार ते रविवारी पर्यत सुरू होते. याठिकाणी या मुलीच्या वडीलांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. दुपारी वडिलांना पिण्याच्या पाण्याची बाटली आणि काही सामान घेऊन क्रिकेट सामने ठिकाणी गेली होती. परंतु ती वडिलांकडे पोहचलीच नाही. सायंकाळी 5 वाजता वडील घरी पोहचल्यावर सर्वत्र शोधाशोध केल्यावर जंगलात आराध्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलिस निरीक्षक बाळा कुंभार, वनविभागाचे अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. यावेळी तिचा मृतदेह आढळून आला.

हत्येची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनीही तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी आराध्याचे तोंड फाटले होते. तिच्या हातापायावर प्राण्याच्या नखांच्या खुणा तसेच तिच्या नखांमध्ये प्रणाचं केस आढळल्याने जंगलातील हिसंक प्राण्याने हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रात्री उशीरा खालापूर प्राथमिक रूग्णालयात मृतदेह आणल्यावर सकाळी पुढील तपासाच्या दृष्टिकोनाातून जेजे रूग्णालयात हालविण्यात आहे. सोमवारी सकाळापासून क्राईम ब्रँचचे पोलिस अधिकारी, वनविभागाचे अधिकारी तपास करीत होते.

त्यानंतर तिचे शवविच्छेदन सर. जे. जे. रूग्णालय मुंबई येथे करण्यात आले तेव्हा तिचा गळा दाबून तिच्या डोक्यात हत्याराने जखम केल्याने मयत झाल्याचे सांगितल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाची परिस्थिती पाहता या मुलीस कोणत्यातरी हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याचे वाटत होते. परंतु कोणतेही पुरावे घटनास्थळी किंवा आजुबाजुचा परिसरात मिळुन येत नव्हते, तसेच घटनास्थळ हे जंगलभागात असल्याने त्या ठिकाणी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे, अथवा इतर माहिती उपलब्ध होत नव्हती. तसेच कारगाव गाव व घटनास्थळ हे अत्यंत जवळ असल्याने तांत्रिक बाबींची पडताळणी करणे देखील अत्यंत अवघड होते. तसेच त्या दिवशी गावामध्ये क्रिकटचे सामने आयोजित केल्यामुळे आजुबाजुच्या गावातील मोठ्या प्रमाणावर क्रिकेटचे संघ व प्रेक्षक गावामध्ये त्यामुळे त्या प्रत्येकाकडे चौकशी करणे अत्यंत जिकीरीचे झाले होते. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे व गुन्ह्याची उकल करणे अत्यंत कठीण होते.

त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व त्यांच्या पथकाने यातील या मुलीस जंगलाच्या दिशेने जाताना पाहणार्‍या शेवटच्या इसमाकडे पुन्हा चौकशी केली. त्यावेळी चौकशी दरम्यान तो घाबरलेला व प्रत्येक चौकशीचे वेळी वेगवेगळी माहिती देऊ लागल्याने पोलीसांचा त्याच्यावर संशय बळावला. संशयित आरोपी प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देत होता. त्यामुळे सखोल पद्धतीने तपास केला असता आरोपीत याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचेकडे गुन्हा करण्याचा उद्देशाबाबत तपास केला असता मयत मुलगी ही त्याच्या समोरून एकटी जंगल भागाकडे गेल्याने त्या परिस्थितीचा फायदा उचलण्याच्या हेतुन त्याने तीचा पाठलाग केला. घटनास्थळी बळजबरीने नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती घरी नाव सांगेल या भितीने तीचा गळा दाबुन व त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून ठार मारून खून केला आहे. अशी कबुली दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार व सहकारी तपास पथक हे करीत आहेत.

पोलीस अधीक्षक रायगड सामनाथ घर्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस संजय शुक्ला, किरण सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक खालापूर बाळा कुंभार, शिरीष पवार, अञ्चनाथ खेडकर, विश्‍वजीत काईगडे, तेडुंलकर, गणेश कराड, बालवडकर, अजित साबळे, तृप्ती बोराटे, प्रदीप आरोटे, सरला काळे, महेश कदम निलेश सोनावणे, तुषार सुतार, नितीन शेडगे, हेमंत कोकाटे, सचिन व्हसकोटी, गणेश गिरी शरद फरांदे, प्रतिक सावंत, सुधीर मोरे, राकेश म्हात्रे सायबर सेल कडील स्टाफ यांनी कसून रात्रंदिवस तपास केला. अपघातग्रस्त टीममचे गुरूनाथ साठेलकर यांच्या टीमने मोठी मदत केल्यामुळेच आरोपी अजय विजय चव्हाण यास अटक करण्यात यश आले आहे.

Exit mobile version