। पनवेल । वार्ताहर ।
एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात आरोपीने फुस लावून पळवून नेल्याची घटना पनवेल शहरामध्ये घडली आहे. अलिशा तौसिफ तबीब असे या अल्पवयीन मुलीचे नाव असून तिचे वय- 15 वर्षे, उंची- 5 फुट अंदाजे, रंग- सावळा, चेहरा उभट, बांधा मध्यम, केस काळे लांब, नाक सरळ, अंगात निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, काळी पॅन्ट तसेच बुरखा परिधान केलेला आहे. सदर मुलीबाबत कोणाला काही माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण मो. 9823193888 यांच्याशी संपर्क साधावा.
अल्पवयीन मुलीला फुस लावून नेले पळवून
