अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल जवळील पारगाव येथे राहणाऱ्या 16 वर्षीय तरुणीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सदर तरुणीचे नाव प्रज्ञा सतिश शिंदे (16), रंग निमगोरा, अंगाने-मध्यम, उंची 5 फुट 2 इंच, डोक्याचे केस काळे व लांब, नाक सरळ, डोळे-काळे, अंगामध्ये नेसून पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, भाषा – हिंदी, व मराठी भाषा बोलणारी आहे. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version