| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिल्पा संतोष कुशवाह (16) या अल्पवयीन मुलीला तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेले असल्याची घटना घडली आहे. याबाबत संतोष कुशवाह (वय 38, रा. बळीराम पाटील चाळ, कालीवली, पो.आपटा) यांनी या मुलीची बेपत्ता झाल्याची तक्रार रसायनी पोलीस ठाण्यात दाखल केली असून, शिल्पा संतोष कुशवाह, वर्णन वय 16 वर्ष 5 महिने, अंगात पिवळ्या रंगाचा फुल हाताचा सलवार कमीज, पायामध्ये काळ्या रंगाचे सँडल, उंची 5 फूट 2 इंच, चेहरा उभट, रंगाने सावळी, केस काळे लांब, डोळे काळे, गळ्यात लाल रंगाचा दोरा, डाव्या हातात काळ्या व लाल रंगाचा दोरा असे वर्णन असून रसायनी पोलीस ठाण्याचे सपोनि प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.