। रसायनी । वार्ताहर।
मोहोपाडा गावच्या हद्दीतील एस.बी.आय.बँक एटीएम येथे रिस येथे राहणारे गणेश तोताराम मोरे (वय 69, रा. रिस, राजगड सोसायटी जवळ) हे पैसे काढण्यासाठी गेले होते. याचवेळी सुरज विनोद ठाकूर (वय 34, रा. कशेळी टोलनाका, भिवंडी, जि. ठाणे) व अण्णा शेट्टी (वय 42) दोघा आरोपींनी गणेश तोताराम मोरे यांना एटीएम मशीन बंद असल्याचे सांगून त्यांना बोलण्यामध्ये गुंतवून हातचलाखी करुन गणेश तोताराम मोरे यांचे एस.बी. आयचे एटीएम कार्ड बदलून व एटीएम कार्डचा पासवर्ड पाहून त्याचा वापर करुन मोहोपाडा जनता विद्यालय येथील बॅक ऑफ इंडीयाच्या एटीएम मधून 20 हजार रुपये काढून गणेश तोताराम मोरे यांची फसवणूक केली. गणेश मोरे यांनी रसायनी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार केली असून पोलिसांनी या गुह्यातील एक आरोपी सुरज विनोद ठाकूर यास अटक केली आहे.
याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोह एस.बी. पवार हे करीत आहेत.