। अलिबाग। प्रतिनिधी।
अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुड-जंजिरा मार्फत रासेयो विभाग, लायन्स क्लब श्रीबाग, अलिबाग, रायगड जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा वाहतूक शाखा, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा या विषयावर ऑनलाईन राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये लो.शि.प्र. मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चोंढी-किहीम या महाविद्यालयाची रिया कदम (एस.वाय.बी.एस सी.) सिया रमेश मिडी (टि.वाय.बी.एस सी), कु.स्वरूप प्रकाश व्हडगीर (एस. वाय.बी.कॉम) या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेतील पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये सिया रमेश मिडी (टि.वाय.बी.एससी) या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक, तसेच कु.रिया रंजन कदम या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ पारितोषिक संपादन केले. या विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.तृप्ती खोत यांनी केले. यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एल. एस. पी.एम. संस्थेचे अध्यक्ष रविंद्र ठाकूर, उपाध्यक्ष प्रमोद नथुराम पाटील तसेच सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाच्या प्राचार्या लीना पाटील, तसेच सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विशेष कौतुक केले.