| पनवेल | वार्ताहर |
ट्रेलरने मोटार सायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना पनवेल जवळील गव्हाण फाटा बस स्टॉप जुना पनवेल ते उरण मार्गावर घडली आहे.
मोटारसायकलवरुन बादलकुमार शाकेत (25) व त्याचा नातेवाईक रवींद्रकुमार सिंह (30) हे दोघे जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रेलरने त्यांच्या गाडीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात हे दोघे जखमी झाल्याने तसेच सदर अपघातानंतर ट्रेलर चालक ट्रेलरसह पळून गेला.