• Login
Monday, May 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

धरणे रिकामी, प्रशासन निकामी?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 9, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धरणांमधील जलसाठा चिंताजनक; मे मध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील धरणांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लाखो नागरिकांच्या पाणीपुरवठ्याचा आधार असलेल्या धरणांमध्ये जलसाठा तळाला गेल्याने गावागावात पाणी टंचाईची चाहूल लागली आहे. उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना पाण्यासाठीची धावपळ तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीतही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

धरणे अक्षरशः तळाला गेली, आणि प्रशासन मात्र अजूनही फाईलांच्या ढिगाऱ्यातच अडकलेले दिसते. उन्हाळा चढत चालला आहे, टंचाई दारात उभी आहे, पण उपाययोजना अजूनही केवळ कागदावरच असल्यामुळे जनतेचा संताप आता उफाळून येत आहे.

मागील वर्षी चांगला पाऊस होऊनही पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने ही वेळ ओढवल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. प्रशासनाकडून उपाययोजनांची तयारी सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात ठोस पावले उचलली गेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मे महिन्यात जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यातील लाखो नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या लघू पाटबंधारे विभागातील धरणांमधील 27.685 दशलक्ष घन मीटर पाणी संपले असून, केवळ 40.83 दशलक्ष घट मिटर इतके पाणी उरले आहे. अलिबागसह सात तालुक्यातील 13 धरणांमध्ये फक्त सात ते 37 टक्के जलसाठा शिल्लक असून, सुधागडमधील ढोकशेतमधील धरणात शुन्य टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणांमधील जलसाठा चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील वर्षी मे ते ऑक्टोबरच्या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तब्बल तीन हजार 128 मि.मी. इतक्या पावसाची नोंदही करण्यात आली. पावसाच्या पाण्याने धरणे तुडूंब भरून गेले होते. त्यामुळे यावर्षी पाण्याचा दुष्काळ निर्माण होणार नाही, अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांना होती. एकूण तीन हजार 128 मि. मी. इतका पाऊस पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. परंतु, मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही जिल्ह्यात पाण्याचा दुष्काळ कायमच असल्याचे वास्तव उघड झाले आहे. टँकरमुक्त जिल्हा करण्याच्या संकल्पनाच जिल्ह्यात कागदावरच असल्याचे चित्र आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लघू पाटबंधारे विभागाच्या धरणांमध्ये 54 टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र, वाढती उन्हाची तीव्रता, पाण्याची वाढती मागणी अशा अनेक कारणांमुळे धरणांमधील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. जिल्ह्यात उन्हाळी हंगाम सुरु झाला आहे. या हंगामात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये केवळ 40.64 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.या बंधाऱ्यांची एकूण साठवण क्षमता 68.51 दशलक्ष घन मीटर इतकी आहे. मात्र, सध्या फक्त 27.97 दशलक्ष घन मीटर पाणी उपलब्ध आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही वेगाने वाढत आहे. परंतु, धरणांमधील पाण्याची पातळी कमी होत असल्याचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसत आहे.

जिल्ह्यातील अलिबाग, सुधागड, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खालापूर, उरण या तालुक्यातील 11 धरणांमध्ये सात ते 37 टक्के जलसाठा शिल्लक आहे.मूरूड, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, खालापूर, पनवेल या तालुक्यांतील आठ धरणांमध्ये 40 ते 50 टक्के तसेच तळा, रोहा, पेण, पनवेल, खालापूर, म्हसळा या तालुक्यातील आठ धरणांमध्ये 53 ते 75 टक्के आणि सुधागडमधील ढोकशेत धरणामध्ये शुन्य टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जलसाठा झपाट्यान कमी होत असल्याने पाण्याची चिंता वाढू लागली आहे. पावसाळा सुरु होण्यासाठी अजून दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे पाणी सूरळीत राखणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे पाणी कपातीलादेखील सुरुवात करण्यात आली आहे. काही ठिकाणी एक दिवस, तर काही ठिकाणी दोन ते तीन दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे.

धरणांच्या पाण्यावर पाणी पुरवठा योजना अवलंबून
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या 16 लाखहून अधिक असून दोन हजारहून अधिक गावे व वाड्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अनेक धरणांच्या पाण्यावर ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. मात्र धरणांमधील जलसाठा कमी होत असल्याने त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होऊ लागला आहे. अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच शेतीसह जनावरांच्या पाण्याची सोयदेखील या धरणांमधील पाण्यावर होते. त्यांच्यावर ही परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गाळ काढण्यास प्रशासन उदासीन
डोंगरभागातून पडणारा पाऊस धरणांमध्ये साठला जातो. या पाण्याचे शुध्दीकरण करून जिल्ह्यातील लाखो नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. पावसाळ्यात डोंगरभागातून वाहत आलेला गाळ बंधाऱ्यात साचत आहे. परंतू हा गाळ वेळेवर न काढल्यास पाणी कमी आणि गाळ जास्त अशी स्थिती निर्माण होते. तीन हजार हून अधिक मि. मी. इतके पाऊस पडूनही धरणांमधील जलसाठा कमी होण्यामध्ये धरणांतील असलेला गाळ हे कारण आहे. हे गाळ काढण्यासाठी जिल्हा परिषदेेने प्रयत्न केला. परंतू त्यात त्यांना यश आले नाही.त्यामुळे गाळ काढण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याचे चित्र आहे.
धरणांमधील जलसाठ्यावर दृष्टीक्षेप ( टक्केवारीनुसार)
घोटवडे - 07
ढोकशेत - 00
उन्हेरे - 08
कोंडगाव - 23
कवेळे - 19
रानवली - 19
पुनाडे - 24
श्रीगाव - 35
फणसाड - 44
पाभरे - 40
वरंध - 46
खिंडवाडी - 48
कोथुर्डे - 35
खैरे - 44
साळोख - 32
अवसरे - 32
डोणवत - 37
कार्ले - 48
कुडकी - 50
भिलवले -53
कलोते-मोकाशी -50
बामणोली - 54
उसरण - 54
वावे - 75
सुतारवाडी - 65
आंबेघर - 67
संदेरी -68
मोरबे -64
उन्हेरे -08

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appLow water levels in damsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newswater issues
Previous Post

घारापुरी बेटावर उत्खननात सापडले जार

Next Post

लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जमीन विक्रीच्या बहाण्याने लाखोंचा गंडा
sliderhome

Land Scam: आदिवासींच्या जमिनीवर डल्ला?

May 24, 2026
मच्छिमार बांधवांवर आर्थिक संकट
उरण

मच्छिमार बांधवांवर आर्थिक संकट

May 24, 2026
sliderhome

दोन दिवसात मान्सून केरळात

May 24, 2026
Nagaon Beach: उन्हाच्या झळांवर समुद्राच्या लाटांचा गारवा
sliderhome

Nagaon Beach: उन्हाच्या झळांवर समुद्राच्या लाटांचा गारवा

May 24, 2026
PNP Natyagruha: नाट्यप्रभा ग्रामीण कलाकारांना पर्वणी
sliderhome

PNP Natyagruha: नाट्यप्रभा ग्रामीण कलाकारांना पर्वणी

May 24, 2026
Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना
sliderhome

Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना

May 24, 2026
Next Post
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?