| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात मोटारसायकल चोरी करणार्या सराईत दोन गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्याकडून चोरलेल्या तीन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात मोटार सायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिंदे व पोलीस निरीक्षक जोशी यांनी या चोरांना पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे दोन पथके तयार केले. त्यामध्ये सहाय्य्क पोलीस निरीक्षक दळवी, अभयसिंह शिंदे, पोहवा. वाघमारे, पोना.राठोड, पोशि. दुधे, मिसाळ, पोना. पाटील, पोहवा रविंद्र राऊत, पोना परेश म्हात्रे, पोना महेंद्र वायकर, पोना विनोद देशमुख, पोना रविंद्र पारधी, विवेक पारासुर, प्रसाद घरत आदींनी या चोरट्यांचा शोध घेत गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे सदर आरोपी वेदांत अंबावणे व अज्ञान राठोड यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन विविध गुन्ह्यातील तीन दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.