| सुकेळी । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमधिल सुकेळी येथिल जिंदाल हॉस्पिटल कॉलणीच्या पाठीमागच्या जागेमधुन सुकेळी गाव व काही आदिवासी वाड्यांकडे विद्युत पुरवठा करणार्या विद्युत पोलावरील वायर तुटुन पडल्यामुळे शॉक लागून सुकेळी (गणपतवाडी) येथिल दोन गुरांचा मृत्यु झाला.
दरम्यान वायर तुटल्यामुळे सुकेळी विभागातील विजपुरवठा खंडीत झाल्यामुळे येथिल स्थानिकांनी महावितरणाच्या कर्मचार्यांना फोन करुन बोलवण्यात आले. परंतु या दोन कर्मचार्यांनी या ठिकाणी काम करुन आपल्या वरिष्ठ अधिकार्यांना या गोष्टींची माहिती देत तेथुन पल काढला. पंरतु स्थानिकांना याबाबतीत महावितरणाच्या कर्मचार्यांनी कोणत़ीच माहिती न दिल्यामुळे महिवितरणच्या दोन्ही कर्मचार्यांना ग्रामस्थांनानी घेराव घातला. या घटनेची खबर समजताच विनोद निरगुडे, रोहिदास लाड, मनोहर सुटे, राजेंद्र कोकले, विठ्ठल इंदुलकर, जगन कोकले तसेच विभागासह गणपतवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ऐनघर ग्रामपंचायतीचे तळाठी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी व ग्रा.पं.सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.