। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
रॉयल एनफिल्ड मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली आणि या धडकेत 22 वर्षीय अथर्व शेषराव खेडकर राहणार सेक्टर 17 रोडपाली याचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी 18 जानेवारी रोजी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अथर्व खेडकर हा कळंबोली, रोडपाली सेक्टर 17 येथे राहत असून, झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. 17 जानेवारी रोजी अथर्व हा रोडपाली कळंबोली ते पुणे येथे कॉलेजला जाण्यासाठी मित्राची मोटारसायकल रॉयल एनफिल्ड घेऊन निघाला. तो जुना मुंबई- पुणे महामार्गावर रात्री साडेआठच्या सुमारास बारवई पुलाच्या शंभर मीटर अंतरावर पुणे लेनवर आला असताना अज्ञात वाहनाने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत अथर्व जखमी झाला. त्याला एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक कोणतेही मदत न करता पळून गेला.







