दोन कारला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

स्पोर्ट्स बाईक भरधाव चालवून दुभाजक ओलांडून विरुद्ध लेनवर येत दोन कारला धडकून चिन्मय सुनील मसाळ रा. घणसोली याचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पळस्पेफाटा ते गव्हाणफाट्याकडे जाणाऱ्या लेनवरून स्पोर्ट्स बाईक चालवणाऱ्या चिन्मयने दुभाजक ओलांडताना दोन कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले, तर स्पोर्ट्स बाईक चालक चिन्मय सुनील मसाळ हा जखमी झाला. त्याला कामोठेतील एमजीएम रुग्णालय दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Exit mobile version