माणगावात सह्याद्री बझारची नवीन शाखा

। माणगाव । प्रतिनिधी ।

सहकार क्षेत्रात रायगड जिल्ह्यातील नामांकित संस्था सह्याद्री प्राथमिक सहकारी ग्राहक संस्था मर्यादित माणगाव (सह्याद्री बझार) या संस्थेची नवीन शाखा माणगावात निजामपूर रोड मार्गावर दि.1 एप्रिल पासून सुरु होत असल्याची माहिती अँड. राजीव साबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

माणगावात घरपोच मालाची सेवा, उच्च प्रतीचा निवडक व स्वच्छ माल, योग्य वजन, माफक दर, आकर्षक मांडणी, प्रामाणिक सेवा आणि 33 वर्षाची परंपरा जपून निर्माण केलेला ग्राहकांचा विश्‍वास ही या संस्थेची खास वैशिष्ट्ये आहेत. या संस्थेचे संस्थापक स्व. अशोक साबळे असून संस्थापक अध्यक्ष संजय साबळे आहेत. संस्थेची उर्वरित कार्यकारणी नव्याने निवडण्यात आली असून त्यामध्ये संस्थेच्या चेअरमनपदी अ‍ॅड. राजीव साबळे, संचालक नितीन बामगुडे, रत्नाकर उभारे, शैलेश भोनकर, गजानन मोरे, समीर साबळे, सुनील पवार, विरेश येरुणकर, रवींद्र ना. मोरे, संचालिका संगीता उतेकर, श्‍वेता देशमुख अशी निवडण्यात आली आहे.

या संस्थेबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना अ‍ॅड. राजीव साबळे म्हणाले की, सह्याद्री बाजारची नवीन शाखा 1 एप्रिल रोजी माणगाव निजामपूर रस्त्यावर उतेखोलवाडी गावच्या कॉर्नरवर प्रशस्त जागेत सुरु करीत आहोत. या शाखेमुळे या भागातील उतेखोलवाडी गाव, विरेश्‍वर नगर, महाराणा प्रतापनगर, क्रांती नगर, दत्तनगर, एकतानगर, साईनगर, वाकडाईनगर, आदिवासी वाडी येथील नागरिकांना जवळच्या अंतरावर दैनंदिन लागणार्‍या घरगुती वस्तू मिळणार आहेत. या सर्व भागातील नागरिकांचा विचार करीत संस्थेने याठिकाणी संस्थेची नविन शाखा सुरु करण्याचे ठरवून लवकरच ग्राहकांच्या सेवेकरिता शाखा सज्ज होणार आहे.

Exit mobile version