पेंटिंग आणि ग्राफिटी बनवण्यासाठी 82 लाखांची निविदा
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून पालिकेतर्फे पालिका हद्दीतील भिंतींवर भित्तीचित्रे आणि घोषणा रंगवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षभर हे काम करण्यासाठी पालिके तर्फे कंत्राट दार नेमण्यात येणार असून, पालिके तर्फे याकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पालिकेतर्फे एका वर्षासाठी पेंटिंग आणि ग्राफिटी बनवण्यासाठी 82 लाख रुपयांची निविदा काढली आहे.
स्वच्छ भारत सर्वेक्षणात सहभागी पनवेल पालिकेचा क्रमांक उंचवावा या करिता पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. पालिका आयुक्त गणेश देशमुख या करिता आग्रही असल्याने,स्वच्छ भारत सर्वेक्षणात पनवेल पालिकेचा क्रमांक उंचवावा याकरता पालिका प्रशासनदेखील सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून अभियानांतर्गत सामाजिक स्तरावर वर्तणुकीतील बदल घडवून आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना भिंतींवर भित्तिचित्रे किंवा घोषणा रंगविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. कचरा वर्गीकरण आणि शौचालय वापरण्याबाबत अनेक चित्रे किंवा संदेश भिंतीणवर रंगवले जातात.
एका अधिकार्याच्या म्हणण्यानुसार,स्वच्छ भारत सर्वेक्षणाचे महत्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे कारण प्रत्येकाला महत्त्वाच्या ठिकाणी चित्रे दिसतात.पालिके तर्फे एका वर्षासाठी पेंटिंग आणि ग्राफिटी बनवण्यासाठी 82 लाख रुपयांची निविदा काढली आहे. नागरी संस्था पेंटिंग आणि भित्तिचित्रांसाठी स्थाने आणि थीम निर्दिष्ट करेल. स्वच्छ भारत मिशनशी संबंधित चित्रांशिवाय इतर सरकारी चित्रेही बनवली जाणार आहेत