विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली पाहिजे – भास्कर मोकल

| चिरनेर | प्रतिनिधी |

उच्च पदाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली पाहिजे, अर्थात प्रत्येक क्षेत्रात खडतर प्रवास हा आहेच. डॉक्टर, वकील ,शिक्षक, इंजिनिअर या सर्व क्षेत्रात उतरणारा प्रत्येक उमेदवार हा मेहनत कष्ट आणि अपयशाची ठोकर खाऊनच, यशस्वी होत असतो. परंतु आयुष्यात आपल्याला आपले ठरविलेले ध्येय गाठायचे असेल तर अपार कष्टाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन सरपंच भास्कर मोकल यांनी केले.

चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या, विद्या संकुलनाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सरपंच भास्कर मोकल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी ते आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी व्यवस्थापकीय संचालक पी. पी. खारपाटील, उद्योगपती राजेंद्रशेठ खारपाटील, उपसरपंच सचिन घबाडी, उरण पंचायत समितीचे माजी सदस्य रमाकांत पाटील, ऐश्वर्या इंटरप्राईजेसचे संजीवकुमार भगत, ग्राहक मंचाचे शशांक ठाकूर, शेकापचे सुरेश पाटील, तिरंगा पतसंस्थेचे चेअरमन अलंकार परदेशी, गॅस एजन्सीचे प्रदीप पाटील, ग्रामपंचायतीच्या सदस्या मृणाली ठाकर, समुद्रा म्हात्रे, वनिता गोंधळी, निकिता नारंगीकर, नीलम चौलकर, भारती ठाकूर, यशोदा कातकरी, जयश्री चिरलेकर, समीर खारपाटील, सुनिता खारपाटील, मुख्याध्यापक सुरदास राऊत, प्रशासकीय अधिकारी व्ही. ए. पाटील, पर्यवेक्षक आनंद चिर्लेकर, मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे, मुख्याध्यापिका मंदा घरत, कार्याध्यक्ष प्रकाश म्हात्रे, उपकार्याध्यक्षा स्मिता मसुरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शालेय परीक्षेत व दहावी -बारावी बोर्डाच्या परीक्षेत तसेच क्रीडा, वकृत्व, निबंध स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंथना ठाकूर व विजय पवार यांनी केले प्रास्ताविक व अहवाल वाचन मुख्याध्यापक सुरदास राऊत व मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे यांनी केले. आभार रीना केणी यांनी व्यक्त केले.

Exit mobile version