श्रीराम पुल परिसराला नवीन रूप

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत येथे प्रती आळंदी हे पर्यटन क्षेत्र विकसित केले जात आहे. तेथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे लोकार्पण सात जानेवारी रोजी होत आहे. त्यामुळे तेथून वाहणार्‍या उल्हास नदीचे पाणी मातीचा बांध घालून अडवले आहे. त्या पाण्यामुळे उल्हास नदीचे पात्र चोहोबाजूंनी पाण्याने भरले आहे, त्यामुळे उल्हास नदीचा परिसर पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रायणी सारखा दिसू लागला आहे.त्या ठिकाणी भगवान विठ्ठलाची मूर्ती आणि परिसर सुशोभीकरण करण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत होणार्‍या सोहळ्याला उल्हास नदीचे पात्र पाण्याने भरलेले असावे यासाठी नदीमध्ये पाणी अडविण्यासाठी मातीचा बांध घालण्यात आला आहे. उल्हास नदीवर मातीचा बांध घातल्यानंतर नदीचे रूप पालटले आहे. हे पाहून सर्व वारकरी खुश झाले असून आपण आळंदीमध्ये आहोत की पंढरीत आहोत असे बोलू लागले आहेत.

Exit mobile version