| पनवेल | वार्ताहर |
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दुचाकी वाहनासाठी एम.एच.46 सी.के. ही नवीन मालिका येत्या काही दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. उरण, पनवेल, कर्जत, खालापूर विभागात येणार्या इच्छुक वाहनधारकांनी शासकीय नियमानुसार शुल्क भरून आरक्षित करण्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे यांनी दिली आहे. तसेच या मालिकेतील आकर्षक क्रमांकांसाठी इच्छुकांकडून निविदा मागवण्यात येणार आहेत. तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य पारदर्शक पद्धतीने देण्यात येणार आहे.





