पनवेलमध्ये आढळले नवजात बालक

| पनवेल | वार्ताहर |

साधारण 15 ते 20 दिवसांचे अज्ञात बालक पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आले आहे. या बालकाला कोण व्यक्ती सोडून गेली आहे, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

बालक अंदाजे 15 ते 20 दिवसांचे असून, रंग गहूवर्ण आहे. त्याच्या अंगात गुलाबी कुर्ता, डोक्यास पिवळी झालर असलेली टोपी व त्यावर टेडी असे लिहिलेले असून, डायपर घातलेले आहे. हे बालक हिरव्या व गुलाबी शालमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळले. आरपीएफ अंमलदारास हे बालक पनवेल रेल्वे स्टेशन फलाट क्र. 01वर रडत असताना आढळले. बालकाच्या आईवडील किंवा देखभाल करणार्‍या व्यक्तीचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत. याबाबत कोणास माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version