तळा शहरातील राममंदिर परिसरात मद्यपींचा अड्डा

तळा | वाताहर |
तळा शहरातील राम मंदिर परिसर मद्यपींचा अड्डा बनला असून मंदिर परिसरात सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
काही बेजबाबदार व्यक्तींनी मंदिर परिसरातील या शांततेचा गैर फायदा घेत सदर जागेत मद्यप्राशन करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज या ठिकाणी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो.यामुळे मंदिराचे पावित्र्य राखले जात नसल्याने मंदिर परिसरात मद्यप्राशन करणार्‍या मद्यपींवर कडक कारवाई करण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version