महाडच्या ‘ऊथवांतील’ अशीही एक आठवण

                           

श्रीवर्धन | आनंद जोशी |

अधून मधून येऊन हाहाःकार उडविणा-या महाडच्या पुराला ” ऊथव” असे म्हणतात. महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे पहिले प्राचार्य व ज्येष्ठ साहित्यिक प्रिं. रा. भि. जोशी यांनी आपल्या एका पुस्तकात 1962  साली “महाडमधील ऊथव” असा लेख लिहून महाराष्ट्राला ऊथव परिचित करुन दिला होता. नुकताच दि. 21,22 जुलै रोजी महाडला प्रलयंकारी असा पूर येऊन सर्व उध्वस्त करुन गेला. यावेळची एक आठवण अशी की कोमसाप. चे जिल्हा समन्वयक श्री. अ. वि. जंगम यांच्या महाडच्या घराच्या वरच्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले होते. पुरांत त्यांच्या संग्रही असलेली अनेक पुस्तके, दै. सागर, दै. शिवतेजचे अंक भिजून गेले. मात्र प्लॅस्टिक पिशवींत असलेला   1993 चा शिवतेजचा दिवाळी अंक सुरक्षित राहिला. तो अंक अठ्ठावीस वर्षांपूर्वीच्या पुराच्या आठवणी सांगून गेला असे जंगम सर सांगतात. त्या अंकातील “बलवत्तर नशिबाचे” या लेखात उल्लेखित श्री. नेहते नावाचे गृहस्थ त्या पुरांत वाचले होते.

सावित्रीच्या भयंकर पुरांत ते फेकले गेले. नदींत पडलेल्या ट्रकची ताडपत्री नेहते यांना होडीसारखी उपयोगात आली. ते तरंगत होते. सव येथे रेतीच्या ट्रॉलरने नेहते यांना पाण्या – तून वर घेऊन वाचविले होते. त्यावेळी त्यांच्या मनावर एवढा ताण होता की ते दोन दिवस काही बोलत नव्हते. नंतर चार दिवसांनी श्री. जंगम सरांनी त्यांना भेटून पुराच्या घटनेवर दै. ” शिवतेज” मध्ये एक लेख लिहिला होता. तोच हा  जुलै २१ च्या महाडच्या पुरातूनही  सुरक्षित राहिलेला अंक होय. आता श्री. नेहते कुठे राहतात ते माहित नाही असे सांगतांना श्री. जंगम भावुक झाले होते.

Exit mobile version