ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

| नवी दिल्ली | वृत्‍तसंस्था |

ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा पराभव केला. क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान न्यूझीलंडचा 3 विकेट्सने पराभव केला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिला. ऑस्ट्रेलियाची दुसरी कसोटी जिंकण्यात कर्णधार पॅट कमिन्सने महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीत योगदान देत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. यासह न्यूझीलंडचा संघ 31 वर्षांचा दुष्काळ संपवू शकला नाही. 1993 मध्ये मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव केला होता.

Exit mobile version