। पेझारी । वार्ताहर ।
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या पोयनाड येथील ना.ना.पाटील जूनियर कॉलेजच्या 1989 मधील बारावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच श्रीगाव येथे संपन्न झाला. यावेळी उद्योजक अनिल झेमसे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी दिवंगत झालेल्या या बॅचमधील मित्र-मैत्रिणींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रास्ताविकात शाळेतील तत्कालीन स्मृतींना उजाळा देण्यात आला. तसेच, आपल्या शिक्षकांनी आणि शाळेतील पदाधिकारी यांनी आपल्याला चांगले मार्गदर्शन केले म्हणूनच आपण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य करत आहोत म्हणत गुरुजनांबद्दल व पदाधिकार्यांबद्दल ऋण व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी जे.के. एल. प्रसाद, अनिल बागुल, प्रवीण गुंजाळ, राजाराम पाटील, उल्हास पाटील, डॉ.सतीश पाटील, विजय जाधव, सायली पाटील-पिंगळे, अनुपमा पाटील -चवरकर, योगेश टेमकर, श्रीनिवास पोळ, मनोहर किसवे, परेश मोबारकर, उमेश बैकर, सुनील निकम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.