मुरुड जंजिरा नगरपरिषदेतर्फे आत्म निर्भर निधी कॅम्प

| आगरदांडा | प्रतिनिधी |

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्म निर्भर निधी अंतर्गत मुरुड शहरातील पथविक्रेते, टपरीधारक, हातगाडीवाले, स्टॉलधारक यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य म्हणून तारण रहीत कर्ज वितरण करण्याच्या उद्देशाने आज मुरुड जंजिरा नगरपरिषदेच्या कार्यालयात कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सदर योजने अंतर्गत प्रथम रक्कम रुपये 10,000 नंतर रुपये 20,000 व नंतर रूपये 50,000 अशा प्रकारे अर्थसाहाय्य पथविक्रेत्यांना करण्यात येणार आहे.

यावेळी मुरुड जंजिरा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे, मुरुड नगरपरिषदेचे प्रशासनिक अधिकारी -परेश कुंभार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक- चिन्मय जोशी, बॅक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक दिपेश लोखंडे, बॅक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक-अमोल गडाख, आयडीबीआयचे शाखा व्यवस्थापक -सुनील बनसोडे, शुभम सावंत, नंदकुमार आंबेतकर, प्रकाश आरेकर, कपिल वेहेले, मनोज पुलेकर, कुमार आरकशी, निखिल दांडेकर, अरविंद गायकर व पथविक्रिते तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version