विदीत गुजराथीचा सनसनाटी विजय

प्रज्ञानंदवर गुकेशची मात

। टोरांटो । वृत्तसंस्था ।

जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर असलेल्या जपानच्या हिकारू नाकामुराचा बचाव भेदत भारताचा ग्रँडमास्टर विदीत गुजराथीने कँडिडेट्स बुद्धिबळमध्ये सनसनाटी विजय मिळवला आहे. तर, आर. प्रज्ञानंद आपल्याच देशाच्या डी गुकेशकडून दुसर्‍या फेरीत पराभूत झाला. पहिल्या फेरीतील चारही अनिर्णित डावांनंतर आजचे दुसर्‍या फेरीतील चारही डाव निकाली ठरले.

महिलांच्या दुसर्‍या फेरीत आर. वैशालीला चीनच्या झोंगयी टॅनकडून कडवा संघर्ष केल्यानंतर पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या कोनेर हम्पीने रशियाच्या कॅटेरिना लागनोविरुद्धचा डाव अनिर्णित सोडवला. मात्र, चीनच्या झोंगयी टॅन हिने स्वतंत्रपणे आघाडी घेतली आहे. भारताची हम्पी, सालिमोवा आणि लँगो संयुक्तपणे तिसर्‍या स्थानावर आहेत. तर वैशालीला संयुक्तपणे सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. एकूण 12 डावांची ही स्पर्धा आहे. या वर्षातील ही सर्वात मोठी बुद्धिबळ स्पर्धा आहे. यातील विजेता पुढील जागतिक अजिंक्यपदाच्या स्पर्धेत आव्हानवीर असेल.

गुणांक (दुसरी फेरी)

पुरूष : इयान नेपोम्नियाची (1.5), फिरोझा अलिरेझा (0.5), आर प्रज्ञानंद (0.5), डी गुकेश (1.5), हिकारू नाकामुरा (0.5), विदित गुजराथी (1.5), फॅबियानो कारुआना (1.5), निजात आबासोव (0.5)
महिला : झोंगयी टॅन (2), आर वैशाली (0.5), कॅटेरिना लागनो (1), कोनेरु हम्पी (1), नुरग्युल सलीमोवा (1), टिंगकजी लेई (0.5), अलेक्झांड्रा गोर्याचकिना (1.5), अ‍ॅना मुझिचुक (0.5).
Exit mobile version