। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव कोकण रेल्वे स्थानकातील विविध समस्यांबाबत कोकण रेल्वेचे प्रबंध निर्देशक संजय गुप्ता यांची तालुका रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश जैन व मेवाड युवक मंडळ माणगाव अध्यक्ष मांगीलाल कुमावत यांनी बुधवारी (दि.1) माणगाव स्थानकात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले.
माणगाव येथील कोकण रेल्वे स्थानकात प्लॉट नं.1 वर संपूर्ण प्लॅटफॉर्मचे नवीन रेलिंग करावे, पूर्ण पेव्हर ब्लॉक बसविणे, प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था करावी, शेडची व्यवस्था करण्यात यावी, पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, विजेची व्यवस्था करण्यात यावी, पार्किंगच्या जागेत नूतनीकरण करण्यात यावे, मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूला रेल्वे स्टेशनचे फलक लावावे, मंगला एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मस्त्यगंधा एक्स्प्रेस, मंगलोर-मुंबई या गाड्या सुरु कराव्यात अशा माणगाव रेल्वे स्थानकातील विविध समस्यांचे निवेदन कोकण रेल्वेचे प्रबंध निर्देशक संजय गुप्ता यांना तालुका रेल्वे प्रवासी संघटनेकडून देण्यात येऊन या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात अशी विनंती संघटनेकडून करण्यात आली.