पाळणाघरातील मुलीचा विनयभंग

| पनवेल | वार्ताहर |

पाळणाघरात ठेवलेल्या सात वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार खांदेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी गोरखनाथ प्रदीप देशमुख (37) यांच्याविरोधात खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित सात वर्षीय मुलीचे आई-वडील नोकरीनिमित्ताने बाहेर जातात. त्यांनी त्यांच्या सात वर्षीय मुलीला पाळणाघरात ठेवले होते. दि. 10 ते 26 मेदरम्यान सायंकाळी आठच्या सुमारास आरोपी गोरखनाथ देशमुख यांनी या मुलीला किचनमध्ये घेऊन जाऊन विनयभंग गेला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा पीडित मुलीचे आई-वडिल तिला पाळणाघरात ठेवण्यासाठी गेले असता या मुलीने त्या ठिकाणी जाण्यास नकार दिला. यावेळी कौन्सिलरकडे मुलीला नेल्यानंतर तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने गोरखनाथ देशमुखविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version