। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा फेज 1 येथील एका दुकानाला आज सकाळी लागलेल्या आगीत तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. तळोजा फेज 1 मधील अंबिका स्टील सर्व्हिस सेंटर या गृहवस्तू भांडाराच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट होवून लागलेल्या आगीत या दुकानात असणारी एक महिला व दोन मुले जखमी झाले असून, त्यांना नजिकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
तळोजा येथील एका दुकानाला आग; तीन जण जखमी
