। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील तळोजा फेज-2 येथील एका सिडकोच्या मास हाउसिंगचे बी.जी. शिर्के या कॉन्ट्रॅक्टरचे काम सुरू असून तेथील कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या वसाहतीमध्ये अचानक आग लागून या आगीत काही रूमचे मोठे नुकसान झाले आहे. या रूममध्ये एके ठिकाणी अचानक आग लागून ती आजूबाजूला पसरत गेली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब व टँकर पाचारण करण्यात आले व आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या आगीत वित्तहानी झाली असून जीवितहानी झाली नसल्याचे समजून येत आहे.