। पेण । संतोष पाटील ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागून डोंगराच्या कुशीत असणारे गाव म्हणजे अंबिवली. याच अंबिवली गावात इतिहासाच्या पाउलखुणा आपल्याला पहायला मिळतात. असे असतानाही गावातील राजकीय अस्थिरतेमुळे गावाचा विकास खुंटला होता. मात्र गेल्या पाच वर्षापूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या नेहा प्रशांत पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची धुरा आपल्या हातात घेतल्यानंतर करोडो रुपयांचा निधी वापरून गावाच्या विकासकामाला गती दिली.

महत्वाची बाब म्हणजे नेहा पाटील यांनी शासकीय निधी मिळेल याचा विचार न करता स्व:खर्चाने गावातील मुख्य रस्त्याचे काम केले. त्यांचा एकच ध्यास होता तो म्हणजे अंबिवली गावचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करणे. त्याप्रमाणे त्यांनी प्रशांत पाटील, वासुदेव पाटील, राजेंद्र पाटील, मोहनलाल म्हात्रे, रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांचा झपाटाच गावात लावला.

सरपंचाच्या आरक्षणानुसार सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आणि थेट सरपंचाच्या आरक्षणानुसार शेतकरी कामगार पक्षाच्या गावातील सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूकीला सामोरे जायचे ठरविले. त्याप्रमाणे सरपंच पदासाठी सुशिला अरुण पवार यांच्यासोबत इतर 7 उमेदवार बरोबर घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्याचे ठरविले. मात्र, 1 सदस्याला समंजसपणाणे बिनविरोध निवडून दिले.
18 तारखेला होणार्या निवडणूकीमध्ये अंबिवली गावात शेतकरी कामगार पक्ष निर्विवादपणे आपले वर्चस्व ठेवणार यात काही शंकाच नाही. या गावामध्ये झालेली विकासकामे पाहता आणि प्रस्थापित असलेली विकासकामे पाहता शेतकरी कामगार पक्षाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मत ज्येष्ठांनी व्यक्त केले. त्यामुळे पुन्हा एकदा अंबिवली ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकेल असेच दिसून येत आहे.

मागील पाच वर्षात केलेली विकासकामे.
- गावातील मुख्य रस्ता सरपंचांनी स्व:खर्चातून केला.
- आदिवासी वाडी येथे समाज मंदीर, अंगणवाडी, शाळेला शौचालय.
- आदिवासी वाडी येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम.
- दलीत वस्तीमध्ये शौचालयाचे बांधकाम.
- गावातील सर्व अंतर्गत रस्ते.
- अंबिवली ग्रामपंचायतीसाठी 66 लाखांची पाणी योजना. यामध्ये आदिवासी वस्ती व दलीत वस्ती यांचा ही समावेश.
- कोरोनाच्या कठिण काळात ग्रामस्थांना योग्यप्रकारे आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी वेळोवेळी आरोग्य शिबीरांचे आयोजन.
नियोजित कामे
- गावातील तलावंचे सुशोभिकरण करणे.
- आदिवासी वाडी येथील तलावाचे सुशोभिकरण करणे व त्या तलावामध्ये आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी मासे पाळण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीकडून सल्ला घेउन मत्स्यपालन करणे.
- व्यायाम शाळा दुरूस्ती व व्यायाम शाळेमध्ये आधुनिक साहित्य आणणे.
- स्मशानभूमीसाठी संरक्षण भिंत बांधणे
- प्राथमिक व अंगणवाडी शाळा डिजीटल करणे.
- नविन अंगणवाडीची इमारत बांधणे.
- महामार्गालगत अंबिवली ग्रामस्थांसाठी थांबा शेड उभी करणे व त्या शेडमध्ये वाटसरुंसाठी पाणपोईची सुविधा देणे.
अंबिवलीचे मतदार हे जागरुक मतदार आहेत. गावामध्ये शेतकरी कामगार पक्षामार्फत केलेली काम त्यांना ज्ञात आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे, शेकापला मत म्हणजे विकासाला मत. त्यामुळे थेट सरपंचाचे उमेदवार सुशिला पवारांसह सर्व उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील. – प्रशांत पाटील, युवा नेते, शेकाप
थेट सरपंच उमेदवार: सुशिला अरुण पवार
वॉर्ड क्र. 1
- वाघमारे वासुदेव मंगळया
- वाघमारे बुधी पांडुरंग
- पाटील विनया विलास
वॉर्ड क्र.2
- मोकल प्रकाश अंबाजी
वॉर्ड क्र.3
1.पाटील दिपक रामदार
2.पाटील सुषमा निलेश